5 भागांची प्रचंड हॉरर सीरिज, जी कधीच OTT वर झाली नाही प्रदर्शित, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
5 भागांची प्रचंड हॉरर सीरिज, जी कोणत्याही OTT वर झाली नाही प्रदर्शित, पण तरीही देखील ती ठरली सुपरहिट. कुठे पाहू शकता ही सीरिज?

हॉरर आणि सस्पेन्स प्रकारातील वेबसीरिजची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रेक्षक आता केवळ भुतांच्या कथा पाहण्यासाठी नाही तर थरार, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टचा अनुभव घेण्यासाठी अशा वेबसीरिजकडे आकर्षित होत आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे या प्रकारातील अनेक दर्जेदार आणि कमी बजेटमधील कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. अशाच वेगळ्या संकल्पनेवर आधारित ‘पहिला चक्रव्यूह – छलावा’ ही डार्क हॉरर-थ्रिलर वेबसीरिज 2022 मध्ये प्रदर्शित झाली होती.

या वेबसीरिजची कथा एका रहस्यमय आणि अत्यंत धोकादायक सिरीयल किलरभोवती फिरते. या गुन्हेगाराला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची जबाबदारी नव्या पोलीस अधिकारी आशीष दत्ता यांच्यावर सोपवली जाते. मात्र, प्रवासादरम्यान घडणाऱ्या विचित्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनांमुळे कथा अधिकच गूढ बनते.

जून 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे सर्व पाच भाग ऑगस्ट 2022 पर्यंत प्रदर्शित झाले. प्रत्येक भागाचा कालावधी सुमारे 23 ते 38 मिनिटांचा आहे. IMDb वर या मालिकेला 10 पैकी 6.5 गुण मिळाले आहेत. प्रेक्षकांनी विशेषतः तिचा सस्पेन्स, वातावरणनिर्मिती आणि पार्श्वसंगीताचे कौतुक केले असून काहींनी कथानक अधिक प्रभावी असू शकले असते असे मत व्यक्त केले आहे.

हॉरर आणि थ्रिलरची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी ‘पहिला चक्रव्यूह छलावा’ हा एक चांगला पर्याय मानला जातो. ही मालिका सुरुवातीला यूट्यूबवर मोफत प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच ती आता JioHotstar वरही उपलब्ध आहे.