बॉलिवूडच्या 5 प्रसिद्ध माय-लेकींची जोडी, कोणी गाजवला बॉक्स ऑफिस, तर कोणाला करावा लागला करिअरसाठी मोठा संघर्ष?
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर बॉलिवूडला निरोप दिला. तर काही अभिनेत्री अशा देखील ज्यांनी घर सांभाळत करियर देखील केलं. त्यानंतर त्यांच्या मुलींनी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर बॉलिवूडच्या अशा 5 प्रसिद्ध माय-लेकींच्या जोड्या आहे, ज्यामध्ये कोणी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं तर, कोणाला करिअरसाठी मोठा संघर्ष करावा लागला....

एक काळ असा होता जेव्हा चित्रपटसृष्टीत तनुजा यांचं एक वेगळंच अस्तित्व होतं. खोडकर आणि रोमँटिक भूमिकांसाठी त्या अनेकदा सिनेमा निर्मात्यांच्या पसंतीस उतरल्या. 60 च्या दशकात त्या त्यांच्या बोल्ड भूमिकांसाठीही ओळखल्या जात होत्या. 90 च्या दशकात त्यांची मुलगी काजोलने चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तिने देखील आई प्रमाणेच बॉलिवूड गाजवलं.
बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल, हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं एक भक्कम स्थान निर्माण केलं. 1970 च्या दशकात त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं, त्यांची मुलगी, ईशा देओलनेही चित्रपटनिर्मितीत आपले नशीब आजमावलं, पण तिच्या आई प्रमाणे तिची कारकीर्द फार काळ टिकली नाही.
अमृता सिंग 1980 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसल्या. त्यांनी अनेक सिनेमामंध्ये सहाय्यक भूमिकाही साकारल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, त्यांची मुलगी सारा अली खान हिनेही अभिनयात आपले नशीब आजमावलं असून तिनेही चाहत्यांना प्रभावित केले आहे. आज सराा हिला देखील कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही.
श्रीदेवी यांनी 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर, त्यांची मुलगी जान्हवी कपूरनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आज ती बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे या दोन्हीमध्ये यशस्वी कामगिरी करत आहे.
1980 च्या दशकात सोनिया राझदान त्यांच्या सौंदर्य आणि धाडसासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक काळाच्या पुढे असलेल्या भूमिका साकारल्या. त्या आजही अनेक सिनेमांमध्ये काम करत आहेत. दरम्यान, आलिया भट्टनेही आपल्या आईप्रमाणेच सिनेमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.