AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prachi Desai : विवाहित रोहित शेट्टीसोबत अफेअर अन् अचानक गायब झालेली प्रसिद्ध अभिनेत्री; अनेक वर्षांनी पोस्ट करत म्हणाली…

Bollywood Actress Had Affair With Rohit Shetty : बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या रोहित शेट्टीसोबत अफेअरच्या चर्चा होत्या. अभिनेत्री अनेक वर्षांपासून गायब होती. आता अभिनेत्रीनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Prachi Desai : विवाहित रोहित शेट्टीसोबत अफेअर अन् अचानक गायब झालेली प्रसिद्ध अभिनेत्री; अनेक वर्षांनी पोस्ट करत म्हणाली...
| Updated on: Nov 21, 2026 | 3:24 PM
Share

टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत टीव्ही इंडस्ट्रीतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्राची देसाईनं अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे आणि याच काळात तिचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत जोडलं गेलं होतं. इतकंच नाही तर रोहितचं लग्न मोडण्याच्या मार्गावर आलं होतं. अभिनेत्री अनेक दिवसांपासून गायब होती. अशातच आता अभिनेत्रीनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

प्राची देसाईनं वयाच्या 17व्या वर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. अभिनेत्री सर्वप्रथम 2006 मध्ये प्रसारित झालेल्या एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत दिसली. यामध्ये तिनं तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असलेल्या अभिनेता राम कपूरसोबत काम केलं होतं. अभिनयाव्यतिरिक्त, प्राची नृत्यातही पारंगत आहे. तिनं चित्रपटांमध्ये तसंच ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये काम केलंय. 2007 मध्ये, ही अभिनेत्री या शोच्या दुसऱ्या सीझनची विजेती ठरली.

रोहित शेट्टीसोबत अफेअर

प्राची देसाईनं 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. ती ‘लाइफ पार्टनर’, ‘आय, मी और मैं’, ‘पोलिसगिरी’, ‘अझर’, ‘रॉक ऑन 2’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. India.com च्या एका वृत्तानुसार, ‘बोल बच्चन’च्या शूटिंगदरम्यान, प्राची देसाई आणि रोहित शेट्टी एकमेकांच्या जवळ आले. रोहित आधीच विवाहित होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानं आपल्या पत्नीला सोडून प्राचीसोबत राहायला सुरुवात केली. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही आणि रोहित आपल्या कुटुंबाकडे परतला.

View this post on Instagram

A post shared by Pracchi Desai (@prachidesai)

प्राची देसाई अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. सध्या तिच्याकडे कोणताही प्रोजेक्ट नाही. ही अभिनेत्री शेवटची 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सायलेन्स २: द नाईट आउल बार शूटआऊट’ या थ्रिलर चित्रपटात दिसली होती. मात्र प्राची गेल्या अनेक वर्षांपासून स्क्रीनवरुन आणि सोशल मीडियावरुनही गायब होती. तिची शेवटची पोस्ट 10 जून 2025 ची होती. आता जवळपास दीड वर्षांनी अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं स्वतःचे फोटो शेअर करत ‘अस्तित्वाचा पुरावा’ असं कॅप्शन लिहिलं आहे. दीड वर्ष गायब असल्यानं प्राची देसाई कुठे आहे? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झालेला. त्यामुळे आता अभिनेत्रीनं पोस्ट करत उत्तर दिलं आहे.

Follow Us
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!