
या कंपनीने मोठी कमाल केली आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरच्या बदल्यात पाच शेअर देणार आहे. BSE 500 इंडेक्समधील कंपनी युनायटेड वॅन डेर हॉर्स्ट लिमिटेड कंपनीने ही मोठी घोषणा केली आहे. कंपनीने 1.5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटसाठी एक्स-डेट जाहीर केली आहे.त्याचा सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.

युनायटेड वॅन डेर हॉर्स्ट लिमिटेड ही एक इंजिनिअरिंग आणि उत्पादक कंपनी आहे. कच्चे इंधन आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, रसायनं आणि हेवी इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात इंडस्ट्रियल इक्विपमेंट, प्रोजेक्ट सॉल्यूशन्स आणि तांत्रिक सेवा उपलब्ध करुन देण्यात ही कंपनी आघाडीवर आहे.

या कंपनीचे मार्केट कॅप 255 कोटी रुपये इतके आहे. सध्या हा शेअर 184 रुपयांवर ट्रेड करत आहे. येत्या काही दिवसात या शेअरमध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी व्यापारी सत्रात हा स्टॉक 17 टक्क्यांनी वधारून 189.90 रुपयांवर पोहचला. हा शेअर त्याअगोदरच्या सत्रात 162.10 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता.

United Van Der Horst Limited कंपनीने त्यांचा शेअर विभाजीत करण्याची माहिती सेबीला दिली आहे. त्यानुसार गुरुवारी, 22 जानेवारी, 2026 रोजी शेअर विभाजीत होतील. एका शेअरच्या बदलत्या पाच शेअर गुंतवणूकदारांना मिळतील. या तारखेच्या पूर्वी गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी आहे. त्यानंतर त्यांनी जितके शेअर खरेदी केले. त्याच पाचपट शेअर मिळतील.

कंपनीच्या या निर्णयाला शेअरहोल्डर्सनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी या निर्णयाला मंजूरी दिली. त्यानुसार एका शेअरच्या बदलत्या पाच शेअर देण्यात येतील. म्हणजे ज्यांच्याकडे पाच रुपायांचे 100 शेअर होते. आता त्यांच्याकडे 1 रुपयांचे 500 शेअर होतील.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.