
तरुण आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्री आयेशा टाकियाने अनेक ब्युटी ट्रीटमेंट्स केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिने बोटॉक्स, लिप फिलर्स आणि फेशियल एन्हांसमेंट सारख्या कॉस्मेटिक प्रक्रिया केल्या आहेत. तिच्या लूकमधील बदलांनी चाहत्यांना अनेकदा धक्का दिला आहे.

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर, तिच्या डॉक्टरांनी खुलासा केला आहे की ती वृद्धत्वविरोधी उपचार घेत होती. तरुण दिसण्यासाठी ती दोन औषधे घेत होती. अद्याप अभिनेत्रीच्या निधनाचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

श्रीदेवीने तिचं सौंदर्य आणि तरुणपणा टिकवून ठेवण्यासाठी अनेक कॉस्मेटिक उपचार केले होते. रिपोर्ट्सनुसार, तिने बोटॉक्स, स्किन टाइटनिंग, फेशियल लिफ्ट आणि अँटी-एजिंग यासारख्या सुमारे 29 प्रकारच्या ट्रिटमेंट घेतल्या होत्या.

रिपोर्टनुसार, सुष्मिता सेनने तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी अनेक सौंदर्य आणि त्वचेवरील उपचार घेतले आहेत. तुम्हाला तिचे ओठ पूर्वीपेक्षा वेगळे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यासाठी अनेकांनी अभिनेत्रीला खूप ट्रोल केले.

रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरने अनेक कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत, परंतु तिने स्वतः ते अधिकृतपणे स्वीकारलेले नाही. या फोटोमध्ये तुम्ही अभिनेत्रीचे दोन बदललेले लूक पाहू शकता.