
सध्या जागतिक मनोरंजनविश्वात दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार दिग्दर्शन असलेल्या चित्रपटांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अशाच एका चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

अॅक्शन, ड्रामा आणि भावनिक प्रसंगांनी भरलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले. याच जोरावर या चित्रपटाने 6 ऑस्कर पुरस्कार जिंकत इतिहास रचला आहे.

2025 मध्ये प्रदर्शित झालेला 'वन बॅटल आफ्टर अनादर' हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आपल्या वेगळ्या कथानकामुळे विशेष चर्चेत आला. या चित्रपटात संघर्ष, नातेसंबंध आणि मानवी भावनांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.

माहितीनुसार, 'वन बॅटल आफ्टर अनादर' हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे बजेट अंदाजे 830 ते 1000 कोटी रुपयांदरम्यान असल्याचे सांगितले जाते. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने शानदार कामगिरी करत जगभरात सुमारे 2500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

अकादमी अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाने आपला ठसा उमटवला. या चित्रपटाला एकूण 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. त्यापैकी 6 प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवण्यात तो यशस्वी ठरला. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar वर पाहू शकता.