फक्त 3 मिनिटांचं गाणं, जे लोक आजही पुन्हा-पुन्हा ऐकतात, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेसमुळे झाला होता मोठा वाद

बॉलिवूडमधील 62 वर्षे जुनं गाणं, जे कित्येक वेळा ऐकलं तरी भरत नाही मन. ज्यामध्ये अभिनेत्रीने बोल्ड कपड्यांमुळे आणि डान्समुळे झाला होता प्रचंड मोठा वाद. आजही लोक हे गाणं पुन्हा-पुन्हा ऐकतात.

| Updated on: Apr 10, 2026 | 12:10 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या पलीकडे जाऊन आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या गाण्यांची खासियत म्हणजे ती ऐकताच आपोआप ओठांवर शब्द येतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात.

बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या पलीकडे जाऊन आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या गाण्यांची खासियत म्हणजे ती ऐकताच आपोआप ओठांवर शब्द येतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात.

2 / 5

अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया', ज्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आणि आजही ते तितक्याच आवडीने ऐकले जाते.

3 / 5

हे गाणे 'संगम' या चित्रपटातील आहे. हे गाणं 3 मिनिटे 52 सेकंद असून, त्याची धून आणि बोल लोकांना इतके भावले की ते लगेचच हिट ठरले. त्या काळात या गाण्यातील डान्स आणि बोल्ड कपड्यांमुळे वादही निर्माण झाला होता. अभिनेत्रीने सादर केलेल्या बोल्ड डान्समुळे हे गाणे चर्चेत आले होते.

4 / 5

मात्र या वादांनंतरही गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट ते अधिकच गाजले. सुमारे 30 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. जी त्या काळात खूप मोठी रक्कम होती.

5 / 5

'संगम' चित्रपटात एकूण 8 गाणी होती आणि त्यातील बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. मात्र 'मैं क्या करूं राम मुझे बुड्ढा मिल गया' हे गाणे सर्वाधिक गाजले. आजही यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याचे अनेक व्हर्जन पाहायला मिळतात आणि लाखो लोक ते ऐकत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us