या गाण्यामुळे मुंबईतील रस्ते 6 तास झाले होते जाम, शम्मी कपूरच्या डान्सने गाणं झालेलं सुपरहिट

मोहम्मद रफी यांचं 63 वर्षांपूर्वींचं प्रचंड लोकप्रिय गाणं, जे मुंबईत शूट होताना झाली होती प्रचंड गर्दी. या गर्दीमुळे मुंबईतील रस्ते तब्बल 6 तास झाले होते जाम. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट.

| Updated on: Sep 07, 2026 | 3:41 PM
1 / 5
मुंबईत चित्रपटांच्या शूटिंगची चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असायची. मात्र, 63 वर्षांपूर्वी एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान चाहत्यांची गर्दी इतकी वाढली होती की मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल सहा तास वाहतूक ठप्प झाली होती.

मुंबईत चित्रपटांच्या शूटिंगची चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असायची. मात्र, 63 वर्षांपूर्वी एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान चाहत्यांची गर्दी इतकी वाढली होती की मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल सहा तास वाहतूक ठप्प झाली होती.

2 / 5

हे गाणे म्हणजे शम्मी कपूर यांच्या ‘ब्लफ मास्टर’ चित्रपटातील लोकप्रिय ‘गोविंदा आला रे आला’. 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफ मास्टर’ या चित्रपटातील हे गाणं मुंबईतील प्रत्यक्ष रस्त्यांवर चित्रित करण्यात आले होते.

3 / 5

शम्मी कपूर यांच्या लोकप्रियतेमुळे गाण्याच्या शूटिंगची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर जमा झाले. पाहता पाहता गर्दी इतकी वाढली की वाहनांची ये-जा पूर्णपणे ठप्प झाली आणि तब्बल सहा तास मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

4 / 5

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बॅकग्राऊंड डान्सर्स. यासाठी व्यावसायिक नर्तकांना न घेता गिरगावातील चाळीत राहणारे स्थानिक तरुण आणि गोविंदा मंडळाचे सदस्य शम्मी कपूर यांच्यासोबत नाचले होते. त्यामुळे गाण्याला अस्सल मुंबईकरांचा आणि दहीहंडीच्या उत्सवाचा जिवंत रंग मिळाला.

5 / 5

‘गोविंदा आला रे आला’ हे गाणं मोहम्मद रफी यांच्या आवाजाने अजरामर झाले. राजेंद्र कृष्ण यांनी गीत लिहिले, तर आनंदजी-कल्याणजी यांनी संगीत दिले. शम्मी कपूर यांच्या उत्साही आणि खट्याळ अंदाजामुळे गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us