बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री, 30 व्या वर्षी लग्न न करता दिला मुलीला जन्म, आजही बोल्ड लुकने असते नेहमी चर्चेत

बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री, जिचं आयुष्य राहिल प्रचंड वादात. 30 व्या वर्षी लग्न न करता झाली एका मुलीची आई. आज 66 व्या वर्षी देखील बोल्ड लुकने बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर.

| Updated on: Mar 17, 2026 | 11:41 AM
1 / 6
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात. अशाच धाडसी आणि बेधडकपणे बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांच्या प्रेग्नन्सीच्या अफवांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात. अशाच धाडसी आणि बेधडकपणे बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांच्या प्रेग्नन्सीच्या अफवांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

2 / 6

अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये काही युजर्सना त्यांचा ‘बेबी बंप’ दिसल्याचा दावा करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

3 / 6

मात्र, नीना गुप्ता यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1980 च्या दशकात त्यांचे खासगी आयुष्य प्रचंड चर्चेत आले होते. त्या काळात समाजाची विचारसरणी आजइतकी खुली नसल्यामुळे त्यांच्या निर्णयांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तरीही त्यांनी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा मार्ग निवडला.

4 / 6

1980 च्या दशकात नीना गुप्ता यांचे नाते वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत होते. दोघांची भेट एका गॅदरिंगमध्ये झाली होती आणि त्यातून मैत्री, नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र त्या वेळी विवियन रिचर्ड्स विवाहित असल्यामुळे या नात्यावर मोठा वाद झाला.

5 / 6

तेव्हा नीना गुप्ता यांनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. त्या काळात अनेकांनी त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी स्वतःचा निर्णय कायम ठेवत मुलगी मसाबा गुप्ता हिला जन्म दिला. त्यांनी एकटीनेच सिंगल मदर म्हणून तिचे संगोपन केले.

6 / 6

मसाबाच्या जन्मानंतरही विवियन रिचर्ड्स यांनी आपल्या पत्नीला सोडले नाही. त्यामुळे पुढे त्यांचे आणि नीना गुप्ता यांचे संबंध हळूहळू संपुष्टात आले. त्यानंतर त्यांनी भारतात राहून मुलीची जबाबदारी एकटीने सांभाळली. टीका होत असताना देखील त्यांनी हार मानली नाही. अभिनय कारकिर्दीसोबतच त्यांनी मुलीचे संगोपन केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us