
तरुणांना वेळेचे व्यवस्थापन (Time Management) करता आले पाहिजे. चाणक्य म्हणतात, “वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे.” तरुणांनी वेळेची किंमत ओळखून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करावा.

तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या भविष्य उज्वल होईल. “शिक्षणाशिवाय मनुष्य अंध आहे.” असं चाणाक्य म्हणाले आहे. जेवढे ज्ञान मिळेल तेवढे आयुष्य समृद्ध होते. तरुणांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी.

तरुणांमध्ये स्वसंयम आणि शिस्त असलीच पाहिजे.. असे देखील चाणाक्य सांगतात... यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. मन, वाणी आणि कृतीवर नियंत्रण ठेवले की मोठमोठे ध्येये साध्य होतात.

तरुणांना योग्य साथीदारांची निवड करता आली पाहिजे... चाणक्य सांगतात की चुकीच्या संगतीपेक्षा एकटे राहणे श्रेष्ठ. मैत्री, सहकारी आणि साथीदार हे विचारपूर्वक निवडावेत, कारण त्यांचा जीवनावर थेट परिणाम होतो.

योग्य निर्णय घेण्याची क्षणता तरुणांमध्ये असायला हवी... योग्य निर्णयक्षमता आणि दूरदृष्टी... तरुणपणी घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य बदलतात. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीला प्राधान्य द्यावे आणि भविष्यातील परिणामांचा विचार करावा.