सिगरेट पेटवताना सुचलेलं गाणं, शब्द असे की आजही अनेकजण ते आवडीने ऐकतात

70 च्या दशकातील सर्वात अजरामर गाणं, जे सिगरेट पेटवताना सुचलेलं. किशोर कुमार यांनी आवाज देताच ठरलं लोकप्रिय. आजही पावसाळा सुरु होताच लोक आवडीने ऐकतात.

| Updated on: May 22, 2026 | 2:35 PM
1 / 6
70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर गाणी निर्माण झाली. काळ कितीही पुढे गेला तरी काही गाणी लोकांच्या मनातून कधीच जात नाहीत. असच एक सदाबहार गाणं म्हणजे 'चिंगारी कोई भडके'.

70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर गाणी निर्माण झाली. काळ कितीही पुढे गेला तरी काही गाणी लोकांच्या मनातून कधीच जात नाहीत. असच एक सदाबहार गाणं म्हणजे 'चिंगारी कोई भडके'.

2 / 6

आजही हे गाणे ऐकताना प्रेक्षकांच्या मनात वेगळ्याच भावना जाग्या होतात. मात्र या गाण्याच्या निर्मितीमागे एक अतिशय रंजक आणि अनोखा किस्सा दडलेला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याची प्रेरणा एका वारंवार विझणाऱ्या माचीसच्या काडीमुळे मिळाली होती.

3 / 6

1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अमर प्रेम' या चित्रपटातील हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्याच्या जन्मामागचा किस्सा अतिशय रोचक मानला जातो. एका रात्री दिग्दर्शक शक्ती सामंत एका पार्टीत गेले होते. तिथे त्यांची भेट प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांच्याशी झाली. गप्पांच्या ओघात शक्ती सामंत यांनी आपल्या चित्रपटासाठी एक भावनिक आणि मनाला भिडणारे गाणे लिहून देण्याची इच्छा व्यक्त केली.

4 / 6

पार्टी संपल्यानंतर दोघे बाहेर आले तेव्हा वातावरण अत्यंत रोमँटिक झाले होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, जोरदार वारे वाहत होते आणि आकाशात विजांचा कडकडाट होत होता. त्या वातावरणात शक्ती सामंत गाडीत जाऊन बसले पण आनंद बक्षी मात्र त्या पावसाळी वातावरणात हरवून गेले होते.

5 / 6

त्यांनी आपल्या खिशातून सिगारेटचे पाकीट काढले आणि सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे माचीसची काडी वारंवार विझत होती. अनेक काड्या संपल्या पण सिगारेट पेटत नव्हती. त्याच क्षणी त्यांच्या मनात अचानक एक ओळ उमटली 'चिंगारी कोई भड़के…' त्यांनी तात्काळ कागद आणि पेन मागवले आणि त्या पावसाळी रात्रीतच गाणे लिहायला सुरुवात केली.

6 / 6

यानंतर तयार झालेले हे गाणे पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि भावस्पर्शी गाण्यांपैकी एक बनले. 'चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए, सावन जो आग लगाए उसे कौन बुझाए…' या ओळी आजही रसिकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात.

Follow Us