बॉलिवूडच्या 3 टॉप अभिनेत्री, 2 अभिनेत्रींनी सोडलं करिअर, तिसरी अभिनेत्री गाजवतेय बॉलिवूड
बॉलिवूडच्या चार टॉप अभिनेत्री, ज्यामधील तिघींनी करिअरच्या शिखरावर असताना सोडलं करिअर. मात्र, एक आजही बॉलिवूड इंडस्ट्रीवर करतेय राज्य. ओळखणं ही झालं कठीण?

1990 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक वेगळाच सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात ग्लॅमर, रोमांस आणि दमदार कथानक यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत होता. याच काळात काही नवोदित अभिनेत्रींची एंट्री झाली, ज्यांनी आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि स्क्रीन प्रेझेन्सने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. त्यांची स्टाईल, नृत्य आणि अभिनय इतका प्रभावी होता की त्या दीर्घकाळ इंडस्ट्रीवर राज्य करतील असं वाटत होतं. मात्र, काळानुसार त्यांच्या करिअरची दिशा बदलत गेली.

त्यांची स्टाईल, नृत्य आणि अभिनय इतका प्रभावी होता की त्या दीर्घकाळ इंडस्ट्रीवर राज्य करतील असं वाटत होतं. मात्र, काळानुसार त्यांच्या करिअरची दिशा बदलत गेली.

करिश्मा कपूर हिने 1991 मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या लूकबद्दल टीका झाली, मात्र तिने हार मानली नाही. सातत्याने मेहनत घेत तिने स्वतःला सिद्ध केलं आणि 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली. हीरो नंबर 1, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है आणि बीवी नंबर 1 या चित्रपटांमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. 2003 मध्ये तिने संजय कपूर यांच्याशी विवाह केला आणि काही काळासाठी चित्रपटांपासून दूर राहिली. नंतर तिने पुनरागमन केलं, मात्र पूर्वीसारखं यश मिळालं नाही.

शिल्पा शेट्टी हिने 1993 मध्ये बाजीगर मधून पदार्पण केलं. सुरुवातीला तिला फारसं यश मिळालं नाही, पण तिने चिकाटी सोडली नाही. धड़कन या चित्रपटाने तिच्या करिअरला नवी दिशा दिली. तिने केवळ चित्रपटांपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण केली. 'बिग ब्रदर' जिंकून ती जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. फिटनेस, योग आणि टीव्ही शोमुळे ती सतत चर्चेत राहिली. अलीकडे सुखी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं. त्यामुळेच ती आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

सोनाली बेंद्रे हिने 1994 मध्ये आग या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1996 ते 2000 हा तिच्या करिअरचा सुवर्णकाळ ठरला. या काळात तिने दिलजले, डुप्लिकेट, मेजर साब, सरफरोश, जख्म आणि हम साथ साथ हैं यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिचं सौंदर्य आणि सहज अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. 2002 मध्ये तिने गोल्डी बहल यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये काम कमी केलं. पुढे ती हळूहळू इंडस्ट्रीपासून दूर झाली.