
अभिनेत्री चाहत खन्ना ही कायमच चर्चेत असते. चाहत खन्ना हिचा दोनदा घटस्फोट झालाय. आता तिसऱ्यांदा लग्न करण्यास चाहत खन्ना तयार आहे.

चाहत खन्ना ही आपल्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या रोहन गंडोत्रा याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जातंय.

रोहन गंडोत्रा आणि चाहत खन्ना गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. चाहत खन्नाचे पहिले लग्न भरत नरसिंघानी याच्यासोबत झाले.

भरत नरसिंघानीचे लग्न फार काळ टिकले नाही. चाहत खन्नाने फरहान मिर्जासोबत 2013 मध्ये लग्न केले. 2018 मध्ये चाहत खन्नाचा घटस्फोट झाला.

शारीरिक आणि मानसिक त्रास तिला दुसऱ्या लग्नानंतर झाल्याचा आरोप तिने केला. आता 37 व्या वर्षी अभिनेत्री परत लग्न करणार असल्याचे सांगितले जातंय.