
रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोन मुलींचे पालक आहेत. काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलैक हिने दोन मुलींना जन्म दिलाय.

रुबीना दिलैक ही बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. रुबीना दिलैक हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला. हा खुलासा तिने आपल्या आणि अभिनवच्या नात्याबद्दल केला.

रुबीना दिलैक म्हणाली होती की, मी आणि अभिनवने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये काही वाद सुरू होते.

नात्याला शेवटची संधी देण्यासाठी आम्ही दोघांनी बिग बॉसच्या घरात येण्याचा निर्णय घेतला. रुबीना दिलैकच्या या भाष्यानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या.

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे त्यांच्या मुलींसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच शेअर करताना दिसतात.