
14 एप्रिल 2024 रोजी सलमान खान याच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. चाहत्यांसह बाॅलिवूड स्टार देखील हैराण झाले.

सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. मात्र, असे असतानाही त्याच्या घरावर गोळीबार झाला.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान याचा पारा हा चांगलाच चढला होता. हेच नाही तर अधिकाऱ्यांवरच सलमान खान याने संताप व्यक्त केला होता.

एवढी मोठी सुरक्षा असून गोळीबार कसाच झाला हे सलमान खान विचारताना दिसला. सलमान खान याला आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेची देखील काळजी आहे.

आता पोलिसांनी हल्लेखोरांना अटकही केली असून हल्लेखोर पोलिस कोठडीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.