444 दिवसांची FD एकदम भारी, चांगल्या व्याजाचा लाभ उठवा, कोणती बँक फायद्याची
फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडी स्कीममध्ये गुंतवणूकीचा पर्याय अनेकांकडे असतो. या एफडी इन्व्हेस्टमेंटची क्रेज वाढत असून अनेक मोठ्या बँका ग्राहकांसाठी स्पेशल एफडी स्कीम चालवत आहेत आणि यावर तगडे व्याज देखील देत आहे. यात 444 दिवसांची एफडी चांगली प्रसिद्ध आहे. स्टेट बँक ऑफ इंडियापासून सेंट्रल बँक आणि एसबीआय पर्यंत ही योजना चालवत आहे. चला पाहूयात कोणत्या योजनेत चांगले व्याज मिळत आहे.

444 दिवसाच्या एफडीत तगडे व्याज - सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) आपल्या ग्राहकांसाठी 444 दिवसांच्या एफडीत गुंतवणूकीवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक ग्राहकांना एवढ्या दिवसांच्या गुंतवणूकीवर 6.75% चे वार्षिक व्याज देत आहे.
PNB मध्ये किती होतील पैसे ? सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांवर नजर टाकली तर पंजाब नॅशनल बँक म्हणजे PNB देखील आपल्या ग्राहकांना 444 दिवसाची एफडी ऑफर करत आहे. येथे व्याजदर 6.60% मिळत आहे.
Canara Bank बँक देखील देतेय फायदा - कॅनरा बँकेचा 444 दिवसांच्या एफडीत व्याज देण्यात तिसरा नंबर येतो. यात गुंतवणूक केल्यानंतर ग्राहकांना तगडे व्याज मिळत आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यापासून या बँकेत या योजनेत 6.50% व्याज दिले जात आहे.
एसबीआयमध्ये किती व्याजाची ऑफर - देशाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी 444 दिवसांच्या स्पेशल एफडी स्कीममध्ये गुंतवणूकींची संधी देत आहे. यावर वार्षिक व्याजाचे म्हणायचे झाले तर स्टेट बँक ऑफ इंडिया यावर 6.45% टक्के व्याज मिळत आहे.
भले अनेक बँका आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटवर जोरदार व्याज देत आहेत. खास करुन स्मॉल फायनान्स बँकाची एफडी स्कीम सर्वात जास्त व्याज देत आहेत. शेअर बाजारातील चढ उतारानंतर निश्चित रिटर्न मिळवण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा सर्वात शानदार गुंतवणूकीचा पर्याय बनला आहे. मात्र, व्याजदर महत्वाचे आहेत. परंतू एफडीत पैसे लावण्यापूर्वी बँकांचे नियम, मॅच्युरिटीचे नियम, लागू कराच्या नियमांची तपासणी करावी. संबंधित बँकांची आर्थिक स्थिती देखील तपासावी.