PHOTO | माहीमच्या किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचे आगमन, हजारो किलोमीटरचा प्रवास करून ‘सीगल’ मुंबईत!

अथांग पसरलेला समुद्र आणि त्यावर मनसोक्त विहार करणारे पांढरे शुभ्र सीगल पक्षी.. हे चित्र एखाद्या पक्षी अभयारण्यातले नाहीये, तर हे चित्र आहे माहीमच्या समुद्र किनाऱ्यावरचं!

1/5
अथांग पसरलेला समुद्र आणि त्यावर मनसोक्त विहार करणारे पांढरे शुभ्र सीगल पक्षी.. हे चित्र एखाद्या पक्षी अभयारण्यातले नाहीये, तर हे चित्र आहे माहीमच्या समुद्र किनाऱ्यावरचं!
2/5
युरोप आणि अमेरिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सध्या भारतात आले आहेत. वर्षातून साधारण तीनवेळा हे परदेशी पाहुणे काही काळासाठी भारतात मुक्कामी येतात.
3/5
पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे, असं मोहक रूप असलेल्या या पक्ष्यांच्या प्रेमात कुणी पडलं नाही, तरच नवल!
4/5
‘सीगल’ पक्षी पाहण्यासाठी, त्यांना आपल्या कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी दरवर्षी लोकांची भरपूर गर्दी असते. मात्र, कोरोनामुळे यंदा ही गर्दी दिसणार नाहीय.
5/5
सीगल पक्ष्यांचं मुख्य खाणं म्हणजे छोटे मासे आणि खेकडे. पण, स्थानिक लोक त्यांना शेव, चिवडा खाऊ घालत असल्याने, त्याचीही सवय सीगल्सला लागली आहे. (सर्व फोटो : पीटीआय)