
नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गौरी पाठोपाठ नाशिकमधील नेहानच्या लग्नाला देखील काहीच महिने झाले होते. पण सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून नेहाने टोकाचे पाऊल उचलले. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सात पानांची चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने नवऱ्याचे आणि सासरच्या लोकांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तिच्या चिठ्ठीत नेमकं काय काय लिहिली आहे वाचा...

नेहाने आत्महत्या करण्यापूर्वी एका वहीमध्ये सात पानांची चिठ्ठी लिहीली आहे. या चिठ्ठीची सुरुवातच, वरिष्य पोलिस अधिकारी, व माझे भाऊ अशाने केली आहे. पुढे तिने विषय मानसिक त्रास, लैंगिक अत्याचार, हुंडाबळीबाबत असे म्हटले आहे. तिची ही चिठ्ठी वाचल्यानंतर पोलिसांनी नवरा, त्याच्या तीन बहिणी आणि नवऱ्याच्या आईला अटक केली आहे. "माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार. माझे लग्न ४/०६/२०२५ रोजी रेशीमबंध बक्वेट हॉल मध्ये संतोष पंडीत पवार, यांच्या सोबत झाला आहे, माझ्या लग्नाची सुपारी १०/०३/२०२५ रोजी फुटली होती" असे तिने चिठ्ठीमध्ये सुरुवातीला म्हटले आहे.

नेहाचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असते. तसेच तिला खर्चावरुन बोलणे, घरात सतत काम करायला भाग पाडणे, उठल्याबसल्या तिचा अपमान करणे, आईवरुन शिव्या देणे सुरु होते. नेहा या सगळ्याला कंटाळली होती. तिच्या तीन नणदा देखील तिला त्रास देत असल्याचा उल्लेख तिने चिठ्ठीत केला आहे. नेहाने तिच्या सासूबाई देखील उठल्या बसल्या टोमणे मारत असल्याचे सांगितले आहे.

नेहाच्या पतीबाबतही तिने अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. तिने चिठ्ठीमध्ये लिहिले की तिच्या पतीने तिची कौमार्य चाचणी केली. त्यापूर्वी तो तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असते. तिला माहेरी कोणती तरी आशिक असेल असे म्हणत असे. तसेच सासूने एकदा तर नणदेला तिला पाळी आली आहे की नाही हे चेक करायला सांगितलं होतं. तसेच नेहाने परिस्थिती पाहून माहेराहून २००० रुपये आणले होते तरीही तिच्याकडे आणखी मागणी होत होती. तिच्यासाठी हे असह्य होतं.

चिठ्ठीमध्ये नेहाने पतीच्या अनैतिक संबंधांचा देखील उल्लेख केला आहे. तिने सांगितले की नवऱ्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवले होते. माहेरी गेल्यावर माझ्या माहेरच्यांचेही त्यांनी कान भरायला सुरुवात केली. ही सासरी काही काम करत नाही असं सांगून वितुष्ट आणायला लागले. माझं जगणं नकोसं केलं. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच कायमचं संपवण्याचं ठरवलं असं म्हणत नेहानं आपलं आयुष्य संपवलं आहे असे नेहा म्हणाली.