टिटवाळा येथे भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांचा चुराडा केला, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

टिटवाळा येथे बुधवारी सकाळी एक भयानक अपघात घडला,येथील स्टेशन रोड परिसरात एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने १० ते १५ वाहनांचा चुराडा केला आहे..

| Updated on: Feb 18, 2026 | 7:34 PM
1 / 6
वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले असताना टिटवाळा येथील स्टेशन रोडवर निळे ड्रम घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. १५ वाहनांचा चुराडा झाला.

वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले असताना टिटवाळा येथील स्टेशन रोडवर निळे ड्रम घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. १५ वाहनांचा चुराडा झाला.

2 / 6

सकाळी ११ वाजताच्या सुमारास टिटवाळ्यातील स्टेशन रोडवर वाहतूक सुरु असताना एका भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील रिक्षा, टेम्पो अशा जवळपास १० ते १५ वाहनांना चिरडत ५०० मीटरपर्यंत ठोकरत नेले.

3 / 6

टिटवाळ्यातील स्टेशन रोडवर हा अपघात घडला. कंटेनर चालकाने सुमारे फर्लांगभर समोरील वाहनांना घसटवत नेले.यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

4 / 6

या भयानक अपघाताचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आला आहे.सुदैवाने या अपघातात कोणाला मोठी इजा झाली नाही. रिक्षातील प्रवासी थोडक्यात बचावले.

5 / 6

या अपघातात रिक्षा चेपल्या आणि त्यातील चार ते पाच जण प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली जखमींना मदत न करता चालक पळण्याच्या तयारीत असताना संतप्त नागरिकांनी पाठलाग करत त्याला पकडले.

6 / 6

टिटवाळा स्टेशन रोडवर भरधाव कंटेनरने विरुद्ध दिशेने येत रिक्षा,दुचाकी आणि चारचाकी वाहनांनात्याने जोरदार धडक दिली आणि जवळपास अर्धा किलो मीटरपर्यंत सलग १० ते १५ वाहनांना घसटवत त्यांचे मोठे नुकसान केले.या प्रकरणी चालकाला अटक झाली असून त्याची चौकशी सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us