बाप्पाचा चमत्कार! महाभयंकर अपघात, कारमध्ये बाळ, वाटलं आता… आदेश बांदेकरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर हे सध्या अष्टविनायक यात्रा करत आहेत. दरम्यान त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव येत आहेत. नुकताच त्यांनी सांगितलेल्या एका अनुभवाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...

| Updated on: Aug 27, 2025 | 10:28 AM
1 / 7
होम मिनिस्टर या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले अभिनेते, सूत्रसंचालक आणि निर्माते आदेश बांदेकर हे कामय चर्चेत असतात. महाराष्ट्राचे भावोजी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आदेश बांदेकर सध्या बाप्पा महाराष्ट्राचा, महिमा अष्टविनायकाचा या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दरम्यान, त्यांनी एक अनुभव शेअर केला आहे.

2 / 7
आदेश बांदेकर यांच्या बाप्पा महाराष्ट्राचा, महिमा अष्टविनायकाच्या या शोची यात्रा मोरगावपासून सुरू होऊन सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री अशा आठ ठिकाणी पूर्ण होते.

3 / 7
आदेश बांदेकर यांचा हा शो केवळ यात्रा नसून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचं अद्वितीय प्रतीक आहे. या यात्रेदरम्यान आदेश बांदेकर यांनी रांजणगावला घडलेला बाप्पाचा एक चमत्कार सांगितला. एका कार अपघाताचा प्रसंग त्यांनी सांगितला.

4 / 7
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आदेश बांदेकर यांनी रांजणगावचा अनुभव सांगितला आहे. रांजणगावच्या यात्रेत एक कार अपघात झाला होता. त्या गाडीमध्ये एक लहान बाळ होतं. ते बाळ जखमी झालं होतं पण सुरक्षित होतं असे आदेश बांदेकर म्हणाले.

5 / 7
पुढे आदेश बांदेकर म्हणाले, "त्या कुटुंबाने हा प्रसंग गणरायाच्या कृपेचं रूप मानलं. अशा चमत्कारिक अनुभवांनी श्रद्धा किती खोलवर रुजते, हे मला जाणवतं."

6 / 7
"अनेक भाविक पावसात, ओलसर रस्त्यांवरून चालत असतानाही गणपती बाप्पाच्या जयघोषात आनंदाने सहभागी होतात. टाळ-मृदुंगाचा निनाद, प्रसादाची गोडी आणि भक्तिभावाचा उत्साह यात्रेला अधिक रंगतदार बनवतो" असे आदेश बांदेकर म्हणाले.

7 / 7
"अष्टविनायक काय किंवा कोणतीही यात्रा आपण घडवत नाही, आपण फक्त निमित्त असतो असेही आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे.