Aadhar Card update Procedure : आधार कार्डमध्ये चुकलेलं नाव फक्त 5 मिनिटात करा दुरुस्त, जाणून घ्या A टू Z प्रोसेस!

UIDAIने Aadhaar मधील नाव अपडेट करण्यासाठी सप्टेंबर 2026 मध्ये स्वतंत्र SOP जारी केली आहे. नावातील बदलासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अपडेटची प्रक्रिया केली जाते.

| Updated on: Oct 05, 2026 | 5:43 PM
1 / 8
Aadhaar मधील नाव बदलण्यासाठी आता नवीन नियम  : UDDAI ने Aadhaar मधील नाव अपडेट किंवा दुरूस्त करण्यासाठी नवीन प्रक्रिया लागू केली आहे. नावात झालेली साधी स्पेलिंग मिस्टेक, लग्नानंतरचे नाव बदलणे किंवा पुर्ण नाव बदलणे अशा गोष्टींसाठी आता नवा आणि स्वतंत्र नियम लागू करण्यात आला आहे.

Aadhaar मधील नाव बदलण्यासाठी आता नवीन नियम : UDDAI ने Aadhaar मधील नाव अपडेट किंवा दुरूस्त करण्यासाठी नवीन प्रक्रिया लागू केली आहे. नावात झालेली साधी स्पेलिंग मिस्टेक, लग्नानंतरचे नाव बदलणे किंवा पुर्ण नाव बदलणे अशा गोष्टींसाठी आता नवा आणि स्वतंत्र नियम लागू करण्यात आला आहे.

2 / 8

हे सर्व बदल कसे करायचे : सगळ्यात आधी हे समजून घ्या की हे बदल तुम्हाला ऑनलाईन करता येणार नाहीत.कारण ऑनलाईन पोर्टलवर नाव किंवा पत्ता बदलण्याची प्रक्रिया सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्टात किंवा आधारकेंद्रात जावूनच हे बदल करता येतील.

3 / 8

Aadhaar Enrollment form भरा : Aadhaar केंद्रावर जाऊन तुम्हाला सर्वात आधी Aadhaar Enrollment form भरावा लागेल. यामध्ये आपले नाव, पत्ता,फोन नंबर अगदी योग्य भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ती केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल, ज्यावर तुमचा URN नंबर लिहिलेला असतो.

4 / 8

लग्नानंतरचे नाव असे बदला : लग्नानंतर अनेक महिला आपले आडनाव बदलतात. नव्या नियमानुसार महिला फक्त ओळखपत्र दाखवून आपले नाव बदलून घेऊ शकतात.यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते .

5 / 8

डिवोर्सनंतरही नाव बदलण्याची सुविधा आहे उपलब्ध : सध्याच्या काळात लग्न होतात आणि ती काही वर्षांतच मोडतात. त्यामुळे UIDAI हा महत्त्वाचा मुद्द लक्षात घेत नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिलेला जर आपले Aadhaar वरचे लग्नाचे नाव बदलायचे असल्यास ती बदलू शकते. यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते.याची माहिती तेथील अधिकारी तुम्हाला देऊ शकतात.

6 / 8

स्पेलिंग मिस्टेकही सहज दुरूस्त केल्या जाऊ शकणार : याआधी आधारा कार्डाच्या नावांमध्ये छोटीशी स्पेलिंग मिस्टेक जरी असली तरी पूर्ण नाव बदलावे लागायचे.पण आता तस न करता नव्या एसओपीनुसार अंतर्गत बारीकशी दुरूस्ती परवानगी मिळते.

7 / 8

नाव किती वेळा बदलता येते : सध्याचा UIDAI च्या नियमांनुसार आधारामध्ये 2 वेळा नाव अपडेट करण्याची परवानगी आहे.यानंतर जर तुम्ही नाव बदलयाचे असेल तर तुम्हाला URN सह UIDAI शी संपर्क साधावा लागेल.

8 / 8

नाव अपडेट करण्यासाठी किती पैसे लागणार : UIDAI च्या सध्याच्या नियमानुसार नाव, जन्मतारीख, लिंग,मोबाईल नंबर, ईमेल बदलण्यासाठी 75 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक अपडेटनुसार प्रत्येक खर्च वेगळा असू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us