
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एक विद्यापीठ आहेत, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

पुण्यातील अमनोरा ग्रुपच्या छत्रभूज नर्से इंटरनॅशनल स्कूलच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी शरद पवार आणि आदित्य ठाकरे एकत्र आले होते.

शाळेच्या उद्घाटनाला आलो आणि एका विद्यापीठाजवळ बसायला मिळालं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

" पवार साहेबांना भेटतो तेव्हा दरवेळी नवनवीन शिकायला मिळतं", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मागील सहा महिन्यामंध्ये कोव्हिड सेंटरचे उद्घाटन केले. मात्र, आज आपण एका शाळेचं भूमिपूजन करतोय, ही चांगली गोष्ट आहे.

राईट टू एज्युकेशनचा कायदा आणला आहे, यो सोबत आपल्याला राईट टू क्वालिटी एज्युकेशन हवं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.