Imran Khan : इमरान खानचे सावत्र वडिल कोण? आमिर खानचे आहेत चांगले मित्र, घटस्फोटानंतर आईचा दुसरा निकाह

Imran Khan : बॉलिवूड अभिनेता इमरान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला भारत सोडण्याची नोटिस देण्यात आली आहे. मूळात इमरान खान कुठल्या देशाचा नागरिक आहे हेच कोणाला माहित नाहीय. त्याच्या आईने दुसरा निकाह केला. त्यांचा दुसरा नवरा आमिर खानचा खूप चांगला मित्र आहे.

| Updated on: Oct 16, 2026 | 12:48 PM
1 / 5
आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खान सध्या चर्चेत आहे. 10 ऑक्टोंबरला सीजेपीच्या आंदोलनात तो सहभागी झाला. म्हणून त्याला भारत सोडण्याची नोटिस देण्यात आली.  अनेकांना हे माहित नव्हतं की, तो भारतीय नागरिक नाहीय.  त्याचा जन्म अमेरिकेत झाला. त्याच्याकडे तिथलीच नागरिकता आहे.

आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खान सध्या चर्चेत आहे. 10 ऑक्टोंबरला सीजेपीच्या आंदोलनात तो सहभागी झाला. म्हणून त्याला भारत सोडण्याची नोटिस देण्यात आली. अनेकांना हे माहित नव्हतं की, तो भारतीय नागरिक नाहीय. त्याचा जन्म अमेरिकेत झाला. त्याच्याकडे तिथलीच नागरिकता आहे.

2 / 5

इमरानच्या नागरिकतेबद्दल समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यात लोकांचा इंटरेस्ट वाढला आहे. इमरान बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर नासिर हुसैन यांचा नातू आहे. आमिर खान नात्यात त्याचा मामा लागतो. इमरानच्या आईच नाव नुजहत खान आहे. पेशाने त्या मनोचिकित्सक आहेत. निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांची ती मुलगी. ‘यादों की बारात’ आणि ‘तीसरी मंजिल' सारखे सैदव स्मरणात राहणारे चित्रपट त्यांनी बनवले.

3 / 5

नुजहत खान दिग्दर्शक मंसूर खान यांची बहिण आहे. आमिर खानची चुलत बहिण आहे. नुजहत खानचं पहिलं लग्न सॉफ्टवेयर इंजीनियर अनिल पाल यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर इमरानचा जन्म झाला. इमरानचा जन्म 13 जानेवारी 1983 रोजी अमेरिकेच्या विस्कॉन्सिनच्या मॅडिसन शहरात झाला.

4 / 5

इमरान दोन वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तीन वर्षांचा असताना इमरान आईसोबत मुंबईला आला. इमरानचं पालनपोषण त्याच्या आईने केलं. म्हणून तो वडिलांचं आडनाव लावत नाही. घटस्फोटानंतर नुजहत खान यांनी अभिनेता राज जुत्शीसोबत दुसरं लग्न केलं.

5 / 5

राज जुत्शीने 'लगान' सह अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. इमरानने आयुष्याचा बराचसा काळ वडिल राज जुत्शीसोबत घालवला आहे. इमरानने इंटरव्यूमध्ये राज जुत्शी यांना फादर फिगर म्हटलं. नुजहत आणि राज जुत्शी यांचा नातं पुढे टिकलं नाही. राज जुत्शी आणि आमिर खानची चांगली मैत्री आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us