
आमिर खान याची लेक इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा हा उदयपूर येथे पार पडतोय. 3 जानेवारी 2024 रोजीच यांचे कोर्ट मॅरेज झालंय.

आता उदयपूर येथे रितीरिवाजाप्रमाणे विवाहसोहळा पार पडेल. या विवाहसोहळ्यामध्ये काही जवळचे मित्र आणि नातेवाईक हे दाखल होणार आहेत.

रिपोर्टनुसार 8 जानेवारी 2024 रोजी उदयपूर येथे अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडेल. आता या विवाहसोहळ्यासाठी आमिर खान रवाना झालाय.

मुलगा आजाद याच्यासोबत उदयपूरला आमिर खान लग्नासाठी रवाना झालाय. यावेळी खास आऊटफिटमध्ये आमिर खान दिसतोय.

अनेक बाॅलिवूड कलाकार देखील या विवाहसोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. इरा खान ही नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करत आहे.