
अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच लग्न बेडीत अडकणार आहे. येत्या काही दिवसांत ती मेहुल पाई याच्याशी विवाहबद्ध होणार आहे.

आता लग्न होणार म्हटल्यावर तयारी सुरु झाली आहे केळवणाची. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनी अभिज्ञा मेहुलसाठी केळवण ठेवलं होतं.

या केळवणाला सिद्धार्थ, मिताली, अभिज्ञा आणि मेहुलनं धमाल केली आहे.

एवढंच नाही तर अभिनेते आणि निर्माते सुबोध भावे आणि त्यांची पत्नी मंजिरी भावे यांनीसुद्धा अभिज्ञा आणि मेहुलसाठी केळवण आयोजित केलं होतं.

या केळवणाचे फोटो अभिज्ञा भावेनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.