AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janata Party : कॉकरोच पार्टीमुळे रातोरात प्रसिद्धी… अभिजीत दीपके यांचं गाव कोणतं? घराची झलक पाहिलीत का ? Exclusive फोटो समोर

एका सोश मीडिया कॅम्पेनद्वारे सध्या अभिजीत दीपके चर्चेत आले आहेत. अभिजीत हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. पाच दिवसात त्यांच्या इन्स्टाग्रामवर 10 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

| Updated on: May 21, 2026 | 3:51 PM
Share
अभिजीत दीपके हे सध्या सोशल मीडिया सेन्सेशनल बनले आहेत. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. या पार्टीच्या माध्यमातून त्यांनी बेरोजगारी आणि सिस्टमवर सवाल उपस्थित करणारे मिम्स व्हायरल केले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रसिद्ध झाला आहे.

1 / 8
अभिजीत दीपके यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे फॉलोअर्स अचानक वाढले आहेत. अवघ्या पाच दिवसात अभिजीत यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 10.8 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यावरून नागरिकांमध्ये असलेला रोष दिसून येत आहे. तसेच अभिजीत यांच्यावरचा विश्वासही दिसून येत आहे.

2 / 8
अभिजीत हे छत्रपती संभाजी नगरचे राहणारे आहेत. ते मूळचे हिंगोलीचे आहेत. हिंगोलीला त्यांचे काका राहतात. त्यांचं वडिलोपार्जित घर हिंगोलीत आहे. अभिजीत अवघ्या 30 वर्षाचे आहेत. त्यांनी पुण्यातून पत्रकारितेत पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी नुकतीच अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्स या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली आहे.

3 / 8
हिंगोलीतील संतुक पिंपरी येथे अभिजीतचे काका राहतात. तिथलं त्याचं बैठं, पण  मोठं घर जिव्हाळ्याने भरलेलं. झाडं, पाना-फुलांनी भरलेलं अंगण, लोकांची लगबग आणि अभिजीत यांच्याबद्दल वाटणारा अभिमान डोळ्यांतून दिसून येतो. गावकऱ्यांच्या तोंडीही सध्या अभिजीत, त्यांची स्थापन केलेला पक्ष यांच्याच चर्चा रंगलेल्या दिसतात.

4 / 8
अभिजीत हे पहिल्यापासूनच सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अनेक वेळा ते भूमिका घेत असतात. 2020 ते 2022 दरम्यान त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये व्हॉलिएंटर म्हणून काम केलं आहे. त्यांनी 2025मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या निवडणूक रणनीती आणि डीजिटल कॅम्पेन टीममध्येही काम केलं आहे.

5 / 8
अभिजीत यांचं कुटुंब मोठं आहे. त्याचे वडील औरंगाबादला, तर त्यांचे सर्वात छोटे काका हे हिंगोलीत राहतात. तिथेच त्यांची काकू, आजी, असा मोठा परिवार आहे. अभिजीत यांनी केलेल्या कामाचा, त्यांच्या पक्षाचा कुटुंबियांना मोठा अभिमान आहे.

6 / 8
काही मोठं करून दाखवावं, नावं कमवावं अशी त्याची इच्छा आधीपासून होती, त्याने जी पार्टी काढली ते योग्यच केलं, देशातले तरूण त्याच्यासोबत राहतील असा मला विश्वास आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, असं त्याच्या काकांनी बोलून दाखवलं. त्यांच्या शब्दांत पुतण्याचं कौतुक डोकावतं.

7 / 8
माझ्या पुतण्याने जे काम केलंय त्याचा आनंद आहे. चांगलंच काम केलंय त्याने. माणूस पुढे जातो, वर चढतो हे चांगलंच आहे, आम्हाला त्याचा आनंद आहे. कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही, तो लहनापणापासूनच धीट होता, काही ना काही करून दाखवायची इच्छा होतीच, असं त्यांच्या काकूने बोलून दाखवलं. परिवार म्हणून आम्ही ठामपण त्याच्या पाठिशी उभे आहोत. त्याने चांगलं काम कराव, पार्टी भक्कम करावी, अशी अपेक्षा कुटुंबियांनी व्यक्त केली.

8 / 8
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ