अपघातावेळी दिघे साहेब माझ्या पुढच्या गाडीत होते; अभिजीत पानसेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

Abhijit panse on Anand Dighe : दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी 24 वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगितले आहे.

| Updated on: Sep 26, 2025 | 2:58 PM
1 / 6
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे काढणारे दिग्दर्शक म्हणून अभिजीत पानसे ओळखले जातात. नुकताच त्यांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या अपघाताचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

2 / 6
आनंद दिघे यांचा अपघात झाला तेव्हा ते माझ्या पुढच्या गाडीत होते असे अभिजीत पानसे यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे. त्यांनी 24 वर्षांपूर्वीचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

3 / 6
अभिजीत पानसे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "वंदे मातरम नाटकाच्या रिहर्सलला आनंद दिघे साहेब आले होते तेव्हा माझा गोंधळ उडाला होता. नंतर ते प्रयोगाला आले."

4 / 6
पुढे अभिजीत पानसे म्हणाले की, "गणेश दर्शन स्पर्धेच्या आधीचा जो कार्यक्रम होता तो मी बसवला होता. तेव्हा मनोहर जोशी सर लोकसभा अध्यक्ष होते. तेव्हा पाकिस्तानचा झेंडा मी गडकरीत जाळला होता. तेव्हा दिघे साहेब मला म्हणाले की, अरे सर मला म्हणाले की लोकसभा अध्यक्ष आहे, कोणत्या देशाचा झेंडा कुठे माझ्यासमोर जाळतोस."

5 / 6
अभिजीत पानसे यांनी पुढे दिघे साहेबांच्या आठवणीत म्हटले की, "दिघे साहेब आता नाहीयेत तर मी कसा त्यांच्या जवळ वगैरे होतो, तर असं नाहीये. एवढा जवळ वगैरेचा भाग नाहीये पण निश्चित मी त्यांचे कार्यक्रम केले, मला त्यांचा सहवास लाभला."

6 / 6
"आम्ही गणेश दर्शन स्पर्धेचे परीक्षक होतो त्यावेळी दिघे साहेबांचा अपघात झाला होता. दिघे साहेब माझ्या पुढच्या गाडीत होते तेव्हा तो अपघात झाला वंदना टॉकीजच्या इथे. आम्ही उजवीकडे वळून गडकरीला गेलो होतो" असे ते म्हणाले.