त्रिशा कृष्णनने पाहिला थलपती विजय यांचा शेवटचा सिनेमा; सांगितला कसा आहे ‘जन नायकन’?

'जन नायकन' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर थलपती विजय यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने देखील विजय यांच्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे...

| Updated on: Jul 24, 2026 | 3:35 PM
1 / 5
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि  अभिनेते थलपती विजय यांच्या शेवटच्या 'जन नायगन' सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.  आता सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री तृषा कृष्णन हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
त्रिशा हिने 'जन नायगर' सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मैत्रिणींनी त्रिशा हिच्या कारमधील एक फोटो पोस्ट केला आहे. त्रिशाची  मैत्रीण पोस्ट करत म्हणाली, 'एकदा शेवटी, एक अखेरचा डान्स... जो वेडेपणा होतो तो 'जन नायगन..', सध्या पोस्ट सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
'जन नायगन' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा गेल्या सहा महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. अखेर सिनेमा प्रदर्शित झाला.  सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ भाषेत सर्वाधिक कमाई झाली.

4 / 5
'जन नायकन'ने तमिळ भाषेत 36.50 कोटी रुपये, तेलुगू भाषेत 2.75 कोटी रुपये आणि हिंदीत 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशातही या चित्रपटाची छप्परफाड कमाई झाली आहे. परदेशात पहिल्याच दिवशी 'जन नायकन'ने तब्बल 30 कोटी रुपये कमावले आहेत.

5 / 5
त्रिषा आणि विजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या  अनेक महिन्यांपासून दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अद्याप दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही... पण त्यांच्या  नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us