
बॉलिवूडमध्ये वडिल धर्मेंद्र यांच्या इतकीच सनी देओलला लोकप्रियता मिळाली. सनी देओलने अभिनय आणि Action च्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सनी देओल बॉलिवूडचा हिरो असला, तरी त्याची इतरांसारखी चर्चा होत नाही.

सनी देओलने घायल, घातक, बेताब, गदर सारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. पण तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहिला नाही. मीडियामध्ये सनी देओलची चर्चा ही फक्त त्याच्या कामापुरता व्हायची. कारण सनी देओलने त्याचं व्यक्तिगत आयुष्य कधीच मीडियापुढे आणलं नाही.

त्यामुळे सनी देओलच्या पत्नीला ओळखणारे फार कमी आहेत. सनी देओलच लग्न 1984 साली झालं. सनी देओलच्या पत्नीचं नाव पूजा आहे. सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 रोजी झाला, तर त्याची पत्नी पूजा देओलचा जन्म 21 सप्टेंबर 1957 रोजी झाला. दोघा पती-पत्नीच्या वयात फक्त एक महिन्याचं अंतर आहे.

सनी देओलने वडिलांप्रमाणे दुसरं लग्न केलं नाही. पण 90 च्या दशकापासून सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची चर्चा आहे. हे दोघे कधी जाहीरपणे आपल्या नात्याबद्दल बोलले नाहीत. पण अभिनेत्री सुजाता मेहता या कथित कपलबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

लंडनमधला दोघांचा एकत्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची खूप चर्चा झालेली. हा व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. या व्हिडिओत सनी आणि डिंपल दोघे विवाहित असूनही परस्परांचा हात पकडून बसलेले दिसतात.