Maratha Reservation : मुंबई पहिल्यांदा ‘मराठी माणसांनी’ गजबजलेली बघतोय; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Maratha Reservation : सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने "मुंबई पहिल्यांदा ‘मराठी माणसांनी’ गजबजलेली बघतोय" असे म्हटले आहे.

Updated on: Sep 02, 2025 | 1:30 PM
1 / 5
गेल्या पाच दिवसांपासून मुबंईतील आझाद मैदानात मराठा आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर मुंबईत आल्याचे पाहायला मिळाले. सर्वत्र या आंदोलनाची चर्चा सुरु होती. दरम्यान, एका अभिनेत्याने केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून किरण माने आहे. त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

3 / 5
किरण मानेने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मुंबई पहिल्यांदा ‘मराठी माणसांनी’ गजबजलेली बघतोय असे म्हटले आहे.

4 / 5
"माझ्या हयातीत मी मुंबई पहिल्यांदा ‘मराठी माणसांनी’ गजबजलेली बघतोय ! अडाणीच्या ताब्यात जाता-जाता शेवटी का होईना पण आपल्या १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचं यानिमित्तानं सोनं झालं. मराठा बांधवांचे खुप आभार" असे किरण मानेने म्हटले आहे.

5 / 5
किरण मानेची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी मुंबई महाराष्ट्राची, महाराष्ट्र माझा!! अशी कमेंट केली आहे.