
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सचिन श्रॉफने चांदनी कोठी हिच्यासोबत 2023 मध्ये दुसरे लग्न केले.

आता पहिल्याच सचिन श्रॉफ हा आपल्या पत्नीबद्दल बोलताना दिसला. सचिन श्रॉफने नुकताच एक मुलाखत दिलीये. सचिन श्रॉफ म्हणाला की, ज्यावेळी मी शूटमध्ये असतो त्यावेळी माझे लक्ष फक्त तिथेच असते.

ज्यावेळी मी घरी असतो, त्यावेळी मी घरच्यांसोबतच वेळ घालवतो. आम्ही सुट्टी एकसोबत घालून एकमेकांना टाईम देतो. माझी जोडीदार चांदनी खूप अप्रतिम आहे.

हेच नाही तर पुढे सचिन श्रॉफ म्हणाला की, ती माझ्या पाठीचा कणा आहे आणि माझ्या प्रत्येक प्रवासात ती नेहमीच माझ्यासोबत असते.

सचिन श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्नाच्या अगोदर चांदनी कोठीची ओळख लपवून ठेवली होती. सचिन श्रॉफचे पहिले लग्न जूही परमारसोबत झाले होते. सचिन आणि जूहीची एक मुलगी देखील आहे.