
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केले. विशेष म्हणजे अनेक वर्ष यांनी आपले रिलेशन सर्वांपासून लपवून ठेवले. शेवटी 23 जून 2024 रोजी यांनी मुंबईमध्ये लग्न केले.

आता झहीर इक्बाल याने सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतचा अत्यंत खास असा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत.

हा फोटो शेअर करत झहीर इक्बाल याने लिहिले की, हे दिवस, हा वेळ, या फिलिंग, हे मला माहिती होते की हे कायमसाठी आहेत #2017.

यावर कमेंट करत सोनाक्षी सिन्हा हिने म्हटले की, मेरी जान! आज पण आपण दोघे एकमेकांसाठी आहोत. काश हे कधीच संपणार नाही. सोनाक्षी आणि झहीरचा हा फोटो 2017 मधील आहे.

सोनाक्षी सिन्हा ही स्वत:च्या लग्नात धमाका करताना दिसली. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.