
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत काम करणारे कलाकार एक एपिसोडसाठी बक्कळ फिस देखील घेतात. तारक मेहता मालिकेत जेठालालचे पात्र साकारणारे दिलीप जोशी एका एपिसोडसाठी तब्बल 1.5-2 लाख रूपये फिस घेतात.

मुनमुन दत्ता अर्थात बबिता जी एका एपिसोडसाठी 50,000-75,000 रूपये फिस घेत असल्याचा खुलासा झालाय. अनेक वर्षांपासून मुनमुन दत्ता मालिकेत काम करताना दिसते.

तनुज महाशबडे तारक मेहता मालिकेत अय्यरची भूमिका साकारतो. विशेष म्हणजे एक एपिसोडसाठी तनुज 65,000 रुपये फिस घेत असल्याचा खुलासा झालाय.

सोनालिका जोशी अर्थात सर्वांची आवडली माधवी भाभी देखील तारक मेहता मालिकेत सुरूवातीपासूनच धमाकेदार भूमिका साकारते एका एपिसोडसाठी सोनालिका 35,000 रुपये फिस घेते.