
अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर एक पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

अभिज्ञा आता लग्न बंधनात अडकली आहे. सोबतच आता ती तिच्या लग्नाच्या विधींचे फोटो शेअर करतेय.

लग्नापूर्वी तिच्या घरी 'ग्रहमख'ची विधी पार पडली. या 'ग्रहमख'च्या विधीचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या विधीसाठी अभिज्ञानं गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.

पूजेदरम्यान आई-बाबांसोबतचा फोटो देखिल तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेले अनेक दिवस ती लग्नाच्या तयारीचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत होती.