किती सुंदर, लाल साडीमध्ये अक्षया देवधरचं नवऱ्यासोबत खास फोटोशूट, सौंदर्याने लावलं वेड
तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधरचं नवऱ्यासोबत खास फोटोशूट. हटके पोज आणि अभिनेत्री सौंदर्यावर चाहते फिदा. फोटोंची होतेय प्रचंड चर्चा.

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी ही जोडी मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. सध्या त्यांच्या एका खास पारंपरिक फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
या फोटोशूटमध्ये अक्षया देवधर अतिशय सुंदर मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. तिने लाल रंगाची आकर्षक पारंपरिक साडी नेसली असून त्यावर सोन्याचे दागिने, नथ आणि हिरवा चुडा असा पारंपरिक साज केला आहे.
साधेपणासोबतच तिच्या या लूकमध्ये एक वेगळाच रुबाब पाहायला मिळत आहे. तर हार्दिक जोशीने जांभळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे.
या पारंपरिक पोशाखात त्याचा राजबिंडा आणि देखणा अंदाज उठून दिसत आहे. त्याच्या या लूकलाही चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.