
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दलजीत कौर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दलजीत कौरचे पहिले लग्न शालिन भनोटसोबत झाले.

एक मुलगा ही शालिन आणि दलजीत कौरचा आहे. गेल्या वर्षीच अभिनेत्रीने दुसरे लग्न निखिल पटेल याच्यासोबत केले. त्यानंतर अभिनेत्री विदेशात शिफ्ट झाली.

दलजीत कौर आपल्या मुलासोबत अचानक भारतामध्ये परतली. हेच नाही तर निखिल पटेलसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावरून डिलीट केले.

निखिल पटेलचे आडनाव देखील दलजीत कौरने काढून टाकले. आता निखिल पटेल आणि दलजीत कौर यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

दलजीत कौर हिने निखिल पटेल याच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल काहीच भाष्य केले नाहीये. यावर बोलणे टाळताना दलजीत कौर ही दिसत आहे. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.