
अभिनेत्री दिया मिर्झा नुकतंच लग्न बंधनात अडकली आहे. वैभव रेखीसोबत दिया लग्न बंधनात अडकली आहे

दियाचं लग्न अतिशय साध्या पद्धतीनं पार पडलंय. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं.

वैभव आणि दिया लॉकडाऊनपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत आहेत. वैभव पेशानं बिझनेस मॅन आहे.

लाल रंगाच्या या बनारसी साडीमध्ये दिया अधिकच सुंदर दिसतेय.

पाली हिलमधील बेल एअरमध्ये दियाचा हा शाही विवाहसोहळा पार पडला. तसेच लग्नानंतर तिनं आणि वैभव रेखीनं कॅमे-यासमोर पोज दिली.

वैभवचं सुद्धा हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झालं होतं. त्या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.

लग्नाच्या या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.

दिया या फोटोंमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.