
एकीकडे कोरोना डोकंवर काढत आहे तर दुसरीकडे रोज काही तरी विचित्र बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत स्वत:ला आनंदी ठेवणं आता जास्त महत्वाचं आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती आनंदात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्री कल्कि कोचलिननं स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी एक मार्ग काढला आहे.

काही दिवसांपूर्वी तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात ती सर्फिंग करताना दिसली.

या फोटोसोबतच तिनं आपण दोन वर्षांनंतर सर्फिंग करत असल्याचं सांगितलं. सोबतच तिनं इन्स्ट्रक्टरचेसुद्धा आभार मानले आहेत.

कल्किचा हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तर कल्किसाठी अभिनेत्री हेजल तिची चिअरलिडर बनली आहे. हेजलनं कल्किच्या फोटोवर कमेंट करत तिचं मनोबल वाढवलं आहे.

कल्कि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असते.