जांभळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? जिचं सौंदर्य पाहूनच सर्व चाहते घायाळ, कोण आहे ती?

सजने सवरने का मौसम मुबारक म्हणत अभिनेत्रीने शेअर केले जांभळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो. सौंदर्य पाहूनच सर्व चाहते घायाळ. कोण आहे ही अभिनेत्री?

| Updated on: Sep 09, 2026 | 4:13 PM
1 / 5
मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.

2 / 5

सोशल मीडियावर सक्रिय असलेली नेहा नेहमीच आपल्या नवनवीन फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे प्रत्येक नवे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

3 / 5

नुकतेच नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पारंपरिक लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाचा रॉयल पर्पल अर्थात जांभळ्या रंगाच्या साडीतील मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

4 / 5

तिच्या या लूकवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. या खास फोटोशूटसाठी नेहाने नेट-ऑर्गेन्झा फॅब्रिकची जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.

5 / 5

साडीवर असलेलं नाजूक सोनेरी नक्षीकाम, फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि चमचमणारं सिक्विन वर्क तिच्या लूकला आणखी आकर्षक बनवत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us