
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या शाही रिसेप्शन सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. निळ्या सूटमध्ये सोहम रूबाबदार दिसत होता, तर सिल्व्हर रंगाच्या चमचमत्या लेहंग्यामध्ये नववधू पूजाही खूप सुंदर दिसत होती. मिस्टर अँड मिसेस बांदेकर यांचा हा लूक सर्वांनाच खूप आवडला.(Photos : Social Media)

त्यांच्यासह वरमाय सुचिता बांदेकर हिने गुलाबी साडीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आदेश बांदेकर यांचाही शेरवानीतला लूक सर्वांना आवडला.

या सोहळ्यासाठी राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली. उद्धव ठाकरे, रश्मि ठाकरे, संजय राऊत विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, नीना कुळकर्णी यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली. पूजा आणि नीना कुळकर्णी या सध्या एकाच मालिकेत काम करतात, त्यामुळे रिसेप्शनला त्यांचा खास बाँड पहायला मिळाला.

संपूर्ण बांदेकर -बिरारी कुटुंबाचा हा खास क्षणही यावेळी कॅमेऱ्यात कॅप्चर झाला,

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे हाही पत्नी आणि गोड लेकीसह या रिसेप्शनला आवर्जून उपस्थित होता. तसेच मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनीही या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

दिग्दर्शक रवि जाधव यांनीही सपत्नीक या रिसेप्शनला हजेरी लावली. त्यांच्यासह बांदेकर कुटुंबाने काढलेला फोटो व्हायरल होत आहे.