Prajakta Mali : ना लग्न, ना वाद… प्राजक्ता माळीच्या त्या गोष्टीची तुफान चर्चा, सोशल मीडियातून डायरेक्ट..
Prajakta Mali : अभिनेत्री पर्जाक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने शेअर केलेली पोस्टही खूप चर्चेचा विषय ठरली असून त्यावर शेकडो चाहत्यांच्या कमेंट्स आल्या आहेत. असं काय म्हटलं आहे प्राजक्ताने ?

मराठी चित्रपट, मालिका यातून घराघरांत पोहोचलेली, सुंदर, मोहक हास्याने सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आणि सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेली, लाखो हृदयांचा क्रश असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी... तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्याच्यासोबत ती तिच्या आयुष्यातील बऱ्याच घडामोडी, अपडेट्स, नव्या घटना, उपक्रम याबद्दल शेअर करत असते. प्राजक्ताने नुकतीच आणखी एक पोस्ट शेअर केली असून त्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. ( All Photos : Instagram / Prajaktta Mali)

प्राजक्ता हिने नुकताच वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला होता. आरे जंगलात वन विभागाच्या मदतीने 100 हून अधिक झाडे लावल्याची माहिती प्राजक्ताने सोशल मीडियावर दिली. त्याचे काही फोटो, व्हिडीओही तिने यासोबत शेअर केले.

या उपक्रमात Art of Living Foundation चे स्वयंसेवक, वृक्षप्रेमी आणि वन विभागाचे मोठे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे १६-१७ वर्षांखालील ७-८ मुलांनीही या वृक्षारोपण मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. 👏 - असं प्राजक्ताने या पोस्टमध्ये लिहीलं.

"थोडं श्रमदान; समाज आणि निसर्गाप्रती जागृती व कृती आवश्यक आहे. जितका वेळ मिळेल, काम करत रहा," असा संदेशही प्राजक्ता माळी हिने या पोस्टमधून दिला आहे.

तिच्या या पोस्टवर हजारो लाईक्स आले असून अनेक चाहत्यांनी कमेंट्स मधून तिच्या या उपक्रमाचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या, तिचं अभिनंदनही केलं.

खूपच छान उपक्रम, तुझा चाहता म्हणून मीही वृक्षारोपण केलं आहे, अशा अनेक कमेंट्स तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.