पाऊस पडताच प्राजक्ता माळीने दाखवली फॉर्म हाऊसची झलक, किती आहे एका दिवसाचे भाडे?

पावसाळा सुरू होताच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने दाखवली तिच्या कर्जतमधील फार्महाऊसची झलक; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ.

| Updated on: Jul 03, 2026 | 4:49 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पावसाळ्याची चाहूल लागताच प्राजक्ताने तिच्या कर्जतमधील सुंदर फार्महाऊसची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

2 / 5
तिने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून चाहत्यांकडून त्याला भरभरून पसंती मिळत आहे. प्राजक्ताच्या या व्हिडिओमध्ये हिरवाईने नटलेला परिसर, डोंगररांगा, पावसाच्या सरींनी अधिक खुललेले निसर्गसौंदर्य आणि तिच्या फार्महाऊसचे आकर्षक दृश्य पाहायला मिळते.

3 / 5
शहराच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे फार्महाऊस पाहून अनेकांना हे ठिकाणं प्रचंड आवडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखी खुलून दिसत असल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

4 / 5
कर्जतमध्ये असलेल्या या आलिशान फार्महाऊसमध्ये एकावेळी सुमारे 15 ते 20 जणांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. याशिवाय मोठा आणि प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर, आरामदायी फर्निचर, स्वच्छ खोल्या आणि आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

5 / 5
विशेष म्हणजे फार्महाऊसमधून दिसणारा हिरवागार डोंगर आणि शांत वातावरण पर्यटकांना वेगळाच अनुभव देतो. येथे मुक्कामासाठी शनिवार आणि रविवारी एका दिवसाचे भाडे सुमारे 30 हजार रुपये आहे. तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत एका दिवसासाठी 17 हजार ते 20 हजार रुपये इतके भाडे आकारले जाते असा अंदाज आहे.

Follow Us