लाल साडीत मराठी अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, मॉडर्न ब्लाऊजने वेधलं चाहत्यांचं लक्ष
लाल रंगाची साडी अन् स्ट्रॅपलेस ब्लाऊजमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री बोल्ड फोटोशूट. हटके ब्लाऊज ठरतोय चर्चेचा विषय. कोण आहे ती अभिनेत्री?

अभिनेत्री रेवा कौरसे सध्या तिच्या खास लूकमुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचली आहे.
रेवाने आपल्या अभिनयासोबतच हटके स्टाइलनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या पारंपरिक आणि मॉडर्न लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. रेवाने या फोटोशूटसाठी लाल रंगाची सुंदर पारंपरिक साडी नेसली आहे.
या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून, तिने साडीसोबत स्ट्रॅपलेस डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. या फोटोत तिने कानात मोठे झुमके, नाकात नथ आणि हातात सोन्याच्या डिझायनर बांगड्या घातल्या आहेत.
तर केसांमध्ये माळलेला पांढऱ्या फुलांचा लांब गजरा तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. पारंपरिक दागिने, उठावदार मेकअप आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज यामुळे तिचा हा लूक लक्षवेधी ठरत आहे.