
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या साध्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना रिंकू हिने फोटो पोस्ट केले आहेत. रिंकू कायम वेगवेगळ्या लूकमध्ये चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

आता देखील साध्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत रिंकू हिने Smile…Hope….and Gratitude असं कॅप्शन दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकू हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहते अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक देखील करत आहेत.

रिंकू हिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सैराट मधील ही तीच हिरोईन आहे.. आता विश्वास बसत नाही.. अशी कमेंट एका चाहत्यांने केली आहे.

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर 'सैराट' सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे.