
Sakshi Tanwar Birthday Special : कहानी घर घर की पासून लोकांच्या घरातच नव्हे तर हृदयातही स्थान मिळवणाऱ्या या टीव्ही अभिनेत्रीचा प्रवास थक्क करणारा आहे. टीव्ही मालिकांमधून काम करत छोट्या पडद्यावरची सर्वात गाजलेली, लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्री चौकट मोडत मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला. तिथेही तिने तिच्या अभिनयाची छाप सोडत सर्वात मोठा स्टार, मि.परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम केलं. त्यांच्या चित्रटाने प्रचंड कमाई करत सर्व विक्रम मोडले. आत्तापर्यंत हे सगळं वर्णन वाचून ही अभिनेत्री कोण हे तर तुम्हाला कळलं असेलंच. ही अभिनेत्री म्हणजे साक्षी तन्वर.

साक्षी तन्वरचा जन्म 12 जानेवारी 1973 साली राजस्थानातील अलवर जिल्ह्यात झाला. एकेकाळी एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असलेल्या साक्षीने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. आज ती 53 वर्षांची असून अजूनही लग्न केलेलं नाही.

अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" या शोमध्ये साक्षीने खुलासा केला की दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारीही केली. पण नशिबाने तिच्यासाठी वेगळेच नियोजन केले होते.

शिक्षण घेत असतानाच, साक्षीने दूरदर्शनवरील "अलबेला सूर मेला" या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिली आणि नंतर तिची निवड झाली. मात्र 2000 साली आलेल्या "कहानी घर घर की" या मालिकेने तिला खरी ओळख मिळाली.

या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने क्राइम पेट्रोल 2, बालिका वधू, बडे अच्छे लगते हैं आणि मैं ना भूलुंगी यासारख्या मालिकांमध्ये काम केले.

2016 साली आलेल्या "दंगल" या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये साक्षीने आमिर खानच्या पत्नीची भूमिका केली होती. या चित्रपटाने जगभरात 2074 कोटी रुपयांची कमाई केली आणि भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

साक्षी तन्वरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिने अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र 2018 साली तिने एक मुलगी दत्तक घेतली. तिने तिचे नाव दित्या असं ठेवलं आहे.