Salma Agha: लग्नानंतर अभिनेत्रीच्या करिअरला लागली उतरती कळा, 2 घटस्फोट.. फ्लॉप होताच पाकिस्तानमध्ये गेली
Salma Agha: बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जी तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण करिअरला उतरती कळा लागताच ती पाकिस्तानमध्ये गेली. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घ्या...

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्यामुळे सर्वात जास्त चर्चेत होत्या. या यादीमध्ये अशा एका अभिनेत्रीचे नाव आहे जिने 3 लग्न केले पण तिचा एकही संसार टिकला नाही. लग्नानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली.
आम्ही अभिनेत्री सलमा आगा विषयी बोलत आहोत. त्यांनी निकाह या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील दिल के अरमां या गाण्यामुळे आजही त्यांची आठवण अनेकजण काढताना दिसतात.
सलमा यांत्या जन्म 25 ऑक्टोबर 1954 साली पाकिस्तानमधील कराची येथे झाला. त्यांचे वडील लियाकत गुल ताजिक हे हिऱ्यांचे व्यापारी होते. ते जगभरात प्रसिद्ध होते. सलमा यांच्या आजी अनवरी बेगम यांनी राज कपूर यांच्या मामाशी लग्न केले. राज कपूर यांची आई, सलमा यांच्या सावत्र वडिलांची बहिण होती. सलमा या लंडनमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या ब्रिटिश नागरिक आहेत.
तलाक तलाक तलाक या चित्रपटासाठी सलमान यांनी गाण्याची संधी मिळाली. या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्यानंतर सलमा यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
करिअर यशाच्या शिखरावर असताना सलमा यांना खासगी आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. त्या प्रेमात अपयशी ठरल्या. त्यांनी प्रेमसंबंधातून तीन वेळा निकाह केला होता. पण त्यांनी तीनही वेळा घटस्फोट घेतला. तसेच त्यांच्या करिअरला देखील उतरती कळा लागली.
सलमा यांचे पहिले लग्न 1981 साली जावेद खानशी झाले. पण त्यांनी पाकिस्तानमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे न्यूयॉर्कमधील व्यवसायिक महमूद सिप्रा त्यांच्यावर फिदा झाले. पण त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही.
1989 सलमा यांनी स्क्वॉश खेळाडू रहमत खानशी लग्न केले. या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत. 2010 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.