AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटील अजून एका मुद्यावरुन सरकारला कोंडीत पकडणार, उद्या दुपारी थेट 12 वाजता…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठवड्यात ऑडिओ बॉम्ब टाकून महायुतीची दमकोंडी केली. एका क्लिपने महायुतीतील शिंदे सेना आणि भाजपमधील वादाला हवा मिळाली. आता जरांगे अजून एका मुद्यावरुन सरकारला कोंडीत पकडणार आहेत.

Manoj Jarange Patil : ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटील अजून एका मुद्यावरुन सरकारला कोंडीत पकडणार, उद्या दुपारी थेट 12 वाजता...
ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटील अजून एका मुद्यावरुन सरकारला कोंडीत पकडणार
| Updated on: Oct 27, 2026 | 8:00 AM
Share

Manoj Jarange on Karjat Bjhimashankar Tree Cutting Issue: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्बने राज्यातील राजकारण ढवळून निघाले. 500 कोटी कोणी कोणाला दिले हा कळीचा मुद्दा अजूनही गुलदस्त्यात आहेत. ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून भाजप शिंदे सेनेला अडचणीत आणत आहे की? शिंदे सेना भाजपचा गेम करत आहे, असा प्रश्न चर्चेत आला. या ऑडिओ क्लिपची आता चौकशी आणि तपास होणार आहे. पण या मुद्यावरून महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. तर आता ऑडिओ क्लिप पाठोपाठ आता जरांगे अजून एका मुद्यावरुन सरकारला कोंडीत पकडणार आहेत.

मनोज जरांगे पाटील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीड जिल्ह्यातील दौऱ्यात आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार असून,केज तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड झालेल्या भागाला भेट देणार आहेत.या दौऱ्याच्या माध्यमातून वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्षतोडीवरून जरांगे पाटील सरकारवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

राज ठाकरे सुद्धा कर्जत दौऱ्यावर, वृक्षतोडीचा मुद्दा तापणार

उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांचा कर्जत दौरा होत आहे. मनसे अध्यक्ष वृक्ष तोड ठिकाणी पाहाणी करतील. यावेळी ते साई डोंगरला भेट देतील. राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील ग्रामस्थांसी चर्चा करणार आहेत. सायंकाळी पाच राज ठाकरे यांची सह्याद्रीच्या रक्षणासाठी पोलीस ग्राउंड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभेत मनसे, ‘लावा रे तो व्हिडिओ’ लावण्याची शक्यता आहे.

वृक्षतोडीवरून आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून निषेध व्यक्त

एकीकडे वृक्षलागवडीचे नारे दिले जात आहेत, तर दुसरीकडे झाडांची अक्षरशः कत्तल केली जात आहे… अशा शब्दांत आमदार प्रवीण स्वामी यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून प्रशासनाचा निषेध केलाय.पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा, असे आवाहन केलं जात असताना प्रत्यक्षात मात्र झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत असेल, तर पर्यावरणाचं रक्षण नेमकं करणार कोण, असा सवालही स्वामी यांनी केला त्याचबरोबर होणारी वृक्षतोड थांबवावे असे आवाहन आमदार स्वामी यांच्याकडून राज्य सरकारला करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोडीवरून आणि भीमाशंकर अभयारण्याशी असलेल्या संबंधावरून वाद पेटला आहे. गुजरातमधील टॉरेंट पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी ही वृक्षतोड होत असल्याचा आरोप आहे. वनविभागाने हा प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून जवळपास 16 किलोमीटर दूर असल्याचा दावा केला आहे. कर्जत तालुक्यातील कोतवाल, खलाटी आणि साई डोंगर परिसरात यामुळे वातावरण तापले आहे. कंपनीकडून या परिसरात 60 हजार तर वनविभागाकडून 30 हजार अशी एकूण 90 हजार झाडं लावण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला
Maharashtra MLC Election Results 2026 : महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा फटका कुणाला? निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन