
शोभिता धुलिपाला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. शोभिता धुलिपाला यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री साऊथ अभिनेता नागा चैतन्यसोबत तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरूवात करतंय. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्न करणार आहेत.

आता लग्नाच्या विविध विधींना देखील सुरूवात झालीये. अभिनेत्रीचे काही खास फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्ये अभिनेत्री दिसत आहे.

शोभिता धुलिपाला हिने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. ट्रेडिशनल लूकमध्ये शोभिता धुलिपाला ही दिसत आहे. साडीवर अभिनेत्रीचा सुंदर असा लूक दिसतोय.

लोक शोभिताच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून तिला शुभेच्छा दिसताना दिसत आहेत. शोभिताने धमाकेदार भूमिका आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत केल्या आहेत.