
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पती कुणाल सोबत मॅक्सिकोमध्ये हनिमूनसाठी गेली आहे. हानिमूचे काही हॉट फोटो सोनालीने शेअर केले आहेत.

दुबईमध्ये नोंदणी पद्धतीनं केलेल्या विवाहानंतर सोनाली कुलकर्णी पुन्हा एका बोहल्यावर चढले आहेत. सोनाली आणि कुणालने पुन्हा लंडन, यूके कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहबद्ध कझाले आहेत. त्याच्या या विवाह सोहळ्याला दोघांचे ही कुटुंबीय उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे सोनालीच्या लग्नाच्या तारखा अनेकदा बदलल्या गेल्या. एवढंच नव्हे तर सोनाली व कुणाल दुबईमध्ये अडकले होते. तर त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या शहरात अडकले होते. त्यामुळे त्या दोघांनीही कुटुंबियांच्या अनुपस्थितीत नोंदणीपद्धतीने दुबईत विवाह सोहळा आटपला होता.

लग्नानंतर सोनाली व कुणाल मॅक्सिको येथे हानिमूनसाठी गेले आहेत. दोघेही प्रचंड एन्जॉय करताना दिसून येत आहेत. ते थांबलेल्या रिसॉर्टममधील नॅचरल व्ह्यू सोनालीने शेअर केला आहे.

रिसॉर्टमधून दिसणारा सूर्यास्ताचा सुंदर फोटो सोनालीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.