समुद्रकिनारी साडीमध्ये फोटोशूट, प्रत्येक पोजची होतेय चर्चा, कोण आहे ही अभिनेत्री?
बिग बॉस मराठी 6 फेम मराठी अभिनेत्री तन्वी कोलतेच्या मुंबईतील समुद्रकिनारी साडीमध्ये केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा. फोटो पाहून चाहते झाले घायाळ.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तन्वी कोलते आपल्या अभिनयासोबतच हटके अंदाजामुळेही चर्चेत असते.
‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात आपल्या बिनधास्त आणि स्पष्टवक्त्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या तन्वीने आता एका खास फोटोशूटमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तन्वीने नुकतंच मुंबईच्या समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये तिचा साधा पण आकर्षक लूक पाहायला मिळत आहे.
तन्वीने पांढऱ्या रंगाची, निळ्या फुलांची सुंदर एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसली आहे. या पारंपरिक लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
आपला साडी लूक पूर्ण करण्यासाठी तन्वीने मोठे झुमके, हातात बांगड्या आणि अंगठी असा पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे. समुद्रकिनाऱ्याची पार्श्वभूमी आणि तिचा मोहक अंदाज यामुळे या फोटोशूटला खास ग्लॅमर मिळालं आहे.